कुलगुरू विजय खोलेंनी पत्रकारांना टाळलं

February 4, 2009 4:53 PM0 commentsViews: 2

4 फेब्रुवारी मुंबईमुंबई विद्यापीठाचा कारभार सध्या अनेक वादांमध्ये सापडला आहे. पण या सर्व वादांची उत्तरं न देताच, मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंनी मीडियापासून पळ काढला. कुलगुरू विजय खोलेंना पत्रकारांनी विद्यापीठातल्या वादग्रस्त कारभाराविषयी विचारलं. त्यावर कोणत्याही प्रश्नाचं उत्तर न देता कुलगुरू सरळ पत्रकार परिषदेतून निघून गेले. त्यानंतर तर त्यांनी स्वत:ला केबीनमध्ये दीड तास कोंडून घेतलं. त्यांच्या केबीनबाहेर उभे असलेल्या सुरक्षारक्षकांनी पत्रकारांना केबीनमध्ये जाऊ दिलं नाही.

close