चारा घोटाळ्याची माहिती मागितली म्हणून पोलीस कोठडी

October 16, 2013 1:13 PM0 commentsViews: 743

RTI nagar16 ऑक्टोबर : चारा घोटाळ्याची माहिती विचारणार्‍या आरटीआय कार्यकर्त्यालाच पोलीस कोठडीत जावं लागल्याचा धक्कादायक प्रकार अहमदनगरमध्ये घडलाय. यंदाच्या दुष्काळात नगरमधल्या कर्जत तालुक्यातल्या एका चारा डेपोत 60 दिवसात 95 लाख रुपयांचा चारा वाटप केल्याची बिलं काढण्यात आली.

 

प्रत्यक्षात फक्त दोनच दिवस चारा वाटण्यात आला आणि बाकी बनावट अंगठ्यांच्या शिक्क्याने 95 लाखांची खोटी बिलं काढण्यात आली अशा तक्रारी होत्या. याबाबतची माहिती रामदास सुर्यवंशी यांनी माहितीच्या अधिकारात तहसीलदारांकडे मागितली होती. गेल्या महिनाभरापासून त्यांना माहिती देण्यात टाळाटाळ करण्यात येत होती.

 

दरम्यान, चारा डेपो चालवणार्‍या ठेकेदारानं त्यांच्यासोबत वाद घातला. वादाचं रुपांतर हमरीतुमरीवर आलं. या वादाचा राग धरून सूर्यवंशी यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आणि अत्याचारविरोधी खोट्या केसमध्ये सूर्यवंशी यांना पोलिसांनी अटक केली. त्यामुळे चारा घोटाळ्याची माहिती राहिली बाजूला, आता या कार्यकर्त्याच्या वाट्याला पोलीस कोठडी आलीये.

close