87 व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फ. मुं. शिंदे

October 16, 2013 2:25 PM1 commentViews: 222

f m shinde16 ऑक्टोबर : सासवड इथं होणार्‍या 87 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी फ मुं शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.

 

आज पुण्यात अध्यक्षपदासाठीची मतमोजणी झाली. एकूण 904 मतांपैकी तब्बल 460 मतं मिळवून फ.मुं.शिंदे पहिल्याच फेरीत निवडून आले.

 

संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ कवियत्री प्रभा गणोरकर, फ.मुं. शिंदे, संजय सोनवणी आणि अरूण गोडबोले रिंगणात होते. निवडणुकीसाठी सुमारे 85 टक्के मतदान झालं. आज मतमोजणीच्या पहिल्या फेरीत फमुंनी बाजी मारत अध्यक्षपदी विराजमान झाले आहे.

  • sachin kasodekar

    arun godboleni 16-10-13 chya sampadakiy madhye–pimpri-chinchwad-lokmat–kahi mahatwachya goshti namood kelya aahe tyacha vichar jarur kara

close