फरार नारायण साईला शोधण्यासाठी दिल्लीत छापे

October 16, 2013 1:07 PM0 commentsViews: 147

asaram bapu son16 ऑक्टोबर : लैगिंक अत्याचार प्रकरणी आसाराम बापूच्या मुलाची नारायण साईचा शोध घेण्यासाठी सुरत पोलिसांची टीम दिल्लीत पोहोचलीय.

 

बुधवारी पोलिसांनी दिल्लीतल्या रोहिणी आणि नझफगड या भागांमध्ये तपास केला. दिल्ली पोलिसांना नारायण दिल्लीत असल्याची माहिती मिळाली होती. नारायणचा शोध घेण्यासाठी आसाराम आणि नारायण पूर्वी कोणत्या ठिकाणी भेटी द्यायचे आणि रहायचे त्या सर्व ठिकाणी नारायणचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे.

 

आसाराम बापू आणि नारायण साई यांच्याविरोधात दोन बहिणींनी सुरतमध्ये लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केलीय. या तक्रारीनंतर साई आणि त्यांच्या कुटुंबीयाविरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली होती. नारायण साई दिसत्याक्षणी अटक करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे. तेंव्हापासून नारायण साई फरार झालाय.

close