ईदची सुट्टी घेण्याऐवजी सीमारेषेवर लढणारे एम.एस.खान शहीद

October 16, 2013 2:44 PM0 commentsViews: 909

javan sahid16 ऑक्टोबर : सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापात्या सुरूच आहे. मंगळवारी पाकिस्तानी सैन्यानं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. पँूछ जिल्ह्यातल्या बालाकोटमध्ये पाक सैन्यानं केलेल्या गोळीबारात भारताचा एक जवान शहीद झाला.

 

सीमारेषेवर पाकिस्ताननं संध्याकाळी गोळीबार केल्याची माहिती संरक्षण दलानं दिलीय. या गोळीबारात लान्सनायक एम.एस.खान हा 15 बिहार रेजिमेंटचा जवान शहीद झाल्याय.ऐन बकर ईदच्या पूर्व संध्येला खान यांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे. खान यांना बकर ईदची सुट्टी देण्यात आली होती.

 

मात्र सीमारेषेवर तणावाची परिस्थिती लक्षात घेत खान यांनी सुट्टी रद्द केली होती. खान यांच्यासोबत जखमी झालेल्या जवानाने सांगितलं की, ईद तर येत राहिल पण पाकच्या सैन्याला धडा शिकवणं गरजेच आहे जे रोज घुसखोरी करून उच्छाद मांडत आहे असं खान म्हणाले होते. गेल्या आठवड्याभरात पाकिस्ताननं आठ वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय.

close