मोदी पंतप्रधान झाले तर आनंदच -अडवाणी

October 16, 2013 7:05 PM0 commentsViews: 501

Image img_221752_lalkrushnaadvani_240x180.jpg16 ऑक्टोबर : भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा झाल्यावर नाराज झालेल्या लालकृष्ण अडवाणींनी आज अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदींची प्रशंसा केली. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला सत्ता मिळाल्यास नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यास मला आनंदच होईल अशा शब्दात अडवाणींनी मोदींना आपला पाठिंबा व्यक्त केलाय.

 

अडवाणी हे अहमबादमध्ये कार्यक्रमानिमित्त आले असताना त्यांनी हे वक्तव्य केलं. या कार्यक्रमात मोदीही उपस्थित होते. मोदींची भाजपच्या पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा झाल्यानंतर अडवाणींनी मोदींसोबत दुसर्‍यांदा जाहीर कार्यक्रमात हजेरी लावलीय. यापूर्वी अडवाणी आणि मोदी भाजपच्या भोपाळमधल्या सभेत एकत्र दिसले होते.

 

अडवाणींनी आपल्या भाषणात वाजपेयींच्या काळातलं केंद्र सरकार आणि भाजपशासित राज्य सरकारांचं कौतुक केलं. अडवाणींनी मोदींचं कौतुक करताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून अडवाणींच्या वक्तव्याचं स्वागत केलं. अडवाणींचं हे वक्तव्य म्हणजे भाजपमध्ये सर्व नेते एकदिलानं काम करतायत असा संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचं मानलं जातंय.

close