भारताचा ऑस्ट्रेलियावर ‘विराट’ विजय

October 16, 2013 9:43 PM0 commentsViews: 1790

virat kohali44416 ऑक्टोबर : ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेवलेलं 360 धावांचं बलाढ्य आवाहन तब्बल 9 विकेट राखून फस्त करण्याचा ऐतिहासिक पराक्रम यंग ब्रिगेडने करून दाखवलाय. भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील रन्सचा पाठलाग करतानाचा हा सर्वात मोठा विजय आहे.

 

पहिली बॅटिंग करणार्‍या ऑस्ट्रेलियानं भारतासमोर 359 रन्सचं मोठं आव्हान ठेवलं होतं. पण शिखर धवन आणि रोहीत शर्मा या भारतीय ओपनर्स तुफान फटकेबाजी करत भारताला मोठी ओपनिंग करून दिली. शिखर धवन 95 रन्सवर आऊट झाला. पण रोहित शर्माचा धडाका थांबला नाही. रोहित शर्माने 123 बॉल्समध्ये 17 फोर आणि 4 सिक्स मारत तब्बल 141 रन्स केले. तर भारताचा धडाकेबाज बॅट्समन विराट कोहलीने आज एक विक्रम रचला.

 

फक्त 52 बॉल्समध्ये 8 फोर आणि तब्बल 7 खणखणीत सिक्स ठोकत विराट कोहलीने शानदार सेंच्युरी ठोकली. भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील ही सर्वात जलद ठोकलेली सेंच्युरी आहे. भारताच्या या यंग ब्रिगेडच्या कामगिरीवर भारताने ऑस्ट्रेलियावर 9 विकेटनं हा ऐतिहासिक विजय मिळवलाय आणि 7 मॅचच्या या वन डे सीरिजमध्ये एक- एक अशी बरोबरी साधलीये.

close