ठाण्याच्या आरटीओ ऑफीसला आग

February 5, 2009 5:45 AM0 commentsViews: 4

5 फेब्रुवारी, मुंबईठाण्याच्या जुन्या आरटीओ ऑफिसला गुरुवारी पहाटे अचानक आग लागली. आगीचं कारण अजून समजू शकलं नाही. फायर ब्रिगडेचे आधिकारी आणि पोलीस याचा तपास करत आहेत. या आगीत महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाली.ज्या रूमला आग लागली, त्यामध्ये सुमारे 25 वर्षापुर्वींची जुनी कागदपत्रं होती. ही आग विझवण्यासठी तीन फायर इंजिन, एक वॉटर टँकर तैनात करण्यात आले होते. तीन तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यास फायर ब्रिगेडच्या जवानांना यश आलं.

close