ज्येष्ठ नाटककार गो. पु. देशपांडे यांचं निधन

October 16, 2013 10:41 PM0 commentsViews: 330

g p deshpande16 ऑक्टोबर : ज्येष्ठ नाटककार गो. पु. देशपांडे यांचं आज पुण्यात वृद्धापकाळानं निधन झालं. पुण्यात राहत्या घरी त्यांचं रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास निधन झालं. ते 74 वर्षांचे होते.

 

नाटककार, विचारवंत आणि राज्यशास्त्राचे अभ्यासक म्हणून त्यांची ओळख होती. चीनचे अभ्यासक म्हणूनही त्यांची परिचित होते. वैचारिक लेखनात त्यांचा हातखंडा होता. उद्धवस्त धर्मशाळा हे त्यांनी लिहिलेलं पहिलं नाटक गाजलं होतं. साहित्य क्षेत्रात वैचारिक लेखनात हातखंडा असलेला लेखक हरपला अशी भावना व्यक्त होत आहे.

 

गो पु.देशपांडेंचा साहित्य प्रवास

  • - उद्धवस्त धर्मशाळा
  • - अंधारयात्रा
  • - अंतिम दिवस
  • - रास्ते ही नाटकं
  • - महात्मा फुलेंच्या आयुष्यावर सत्यशोधक नाटक

पुरस्कार

  • - 1977 – नाट्यक्षेत्रातल्या योगदानाबद्दल राज्य सरकारचा पुरस्कार
  • - 1996 – संगीत नाटक अकादमी पुरस्कार
close