मुंडेंचा अर्ज अवैधच, शरद पवार बिनविरोध

October 17, 2013 2:40 PM0 commentsViews: 1054

Image img_239542_munde454_240x180.jpg17 ऑक्टोबर : मुंबई क्रिकेट असोसिएशन अर्थात MCAच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा आखाडा आणखी रंगत चाललाय. भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांचा अर्ज अवैधच ठरवण्यात आला आहे. आज मुंडेंच्या अपीलवर एमसीए अध्यक्ष रवी सावंत यांच्यापुढे सुनावणी झाली. मुंडेंचं मुंबईत कायमस्वरुपी वास्तव नसल्यामुळे त्यांचा अर्ज अवैधच असण्याचा निर्णय सावंत यांनी दिला.

 

सावंत यांच्या निर्णयामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार हे पुन्हा एकदा एमसीएचे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडून आले. मात्र या एमसीएच्या या निर्णायाला मुंडेंनी विरोध केलाय. या निर्णायाविरोधात मुंडे हायकोर्टात धाव घेणार आहे.

 

एमसीएची निवडणूक पुन्हा घेण्यात यावी अशी मागणी करणार असल्याचं मुंडे यांनी सांगितलंय. मुंडेंचा अर्ज अवैध ठरल्यामुळे ते निवडणुकीच्या मैदानात बाद झाले. त्यामुळे नाराज झालेल्या मुंडे यांनी शरद पवारांना लक्ष्य केलं. आम्ही सर्व पुरावे सादर केले होते, त्यामुळे माझं अपील फेटाळणं हा माझ्यावर अन्याय आहे, अशी तक्रारही मुंडे यांनी केली.

close