माओवाद्यांच्या हल्ल्यात 3 पोलीस शहीद, एक माओवादी ठार

October 17, 2013 2:08 PM0 commentsViews: 210

naxal attack3317 ऑक्टोबर : गडचिरोली जिल्ह्यात बडाझारिया या गावाजवळ माओवाद्यांच्या हल्ल्यामध्ये राज्य पोलिसांचे 3 जवान शहीद झाले. तर आज पोली आणि माओवाद्यांच्या चकमकीत एक माओवादी ठार झाला.

 

बडाझारिया हे गाव मुरुमगावपासून 15 किलोमीटर दूर आहे. त्या गावाजवळ माओवादी असल्याची पोलिसांना माहिती मिळली होती. त्यानंतर राज्य पोलिसांच्या सॅग या नक्षलवादीविरोधी पथकाचे जवान कोम्बिंग ऑपरेशन करत होते.

 

त्यावेळी दबा धरुन बसलेल्या माओवाद्यांनी या पथकावर हल्ला केला. माओवाद्यांनी पेरलेल्या भुसुरुंग स्फोटात 3 जवान शहीद झाले. या घटनेनंतर आज पोलिसांना कोम्बिंग ऑपरेशन सुरु केलं असून जारावंडी जंगलात पोलीस आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली, यात 1 माओवादी ठार झालाय.

close