गो. पु. देशपांडे अनंतात विलिन

October 17, 2013 4:39 PM0 commentsViews: 182

gp deshpande pune17 ऑक्टोबर : ज्येष्ठ नाटककार गो. पु. देशपांडे यांच्यावर पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. त्यापूर्वी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी साने गुरुजी स्मारक इथं ठेवण्यात आलं होतं.

 

अंत्यसंस्कारांसाठी सतीश आळेकर, अतुल पेठे, ज्योती सुभाष असे नाट्यक्षेत्रातले अनेक मान्यवर उपस्थित होते. तसंच बाबा आढाव, वृंदा करात या डाव्या चळवळीतले नेत्यांनीही गो.पु. देशपांडे यांना श्रद्धांजली वाहिली. गोपुंचं बुधवारी पुण्यात राहत्या घरी त्यांचं काल रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळानं निधन झालं. ते 74 वर्षांचे होते.

 

नाटककार, विचारवंत आणि राज्यशास्त्राचे अभ्यासक म्हणून त्यांची ओळख होती. चीनचे अभ्यासक म्हणूनही त्यांची परिचित होते. वैचारिक लेखनात त्यांचा हातखंडा होता.उद्धवस्त धर्मशाळा हे त्यांनी लिहिलेलं पहिलं नाटक प्रचंड लोकप्रिय आहे.

close