पवारांनी निवडून यावं यासाठीच अर्ज फेटाळला -मुंडे

October 17, 2013 6:21 PM0 commentsViews: 565

munde on sharad pawar17 ऑक्टोबर : केवळ शरद पवार यांना बिनविरोध निवडून येता यावं यासाठीच माझा अर्ज फेटाळण्यात आलाय असा आरोप एमसीएचे अध्यक्षपदासाठीचे उमेदवार गोपीनाथ मुंडे यांनी केलाय. एम.सी.ए.वर पवारांची मक्तेदारी आहे ती मोडून काढणार असल्याचं सांगत पवारांना बिनविरोध निवडून येण्यासाठीच माझा अर्ज फेटाळल्याचा आरोप मुंडेंनी केलाय.

 

अर्जावर माझा मुंबईच्या निवास्थानाचा पत्ता होता. एक पत्ता हा मुंबईतला आहे तर दुसरा बीडचा आहे. या अगोदरही विलासराव देशमुख यांचा अर्जही फेटाळण्यात आला होता. मात्र त्यांनी त्यानंतर विलासराव यांच्या पासपोर्टवर मुंबईचा पत्ता होता यावर त्यांचा अर्ज घेण्यात आला मग माझाही पत्ता हा पासपोर्टवरचा आहे मग माझा अर्ज का फेटाळला असा सवालही मुंडेंनी उपस्थित केला.

 

एमसीएच्या अर्ज रद्द ठरवण्याच्या निर्णयाच्या विरोधात कोर्टात जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी गोपीनाथ मुंडेंशी याबाबत बातचीत केली यावेळी त्यांनी पवारांवर आरोप केला. तसंच शिवसेनेतल्या घडामोंडींबद्दल मुंडेंना विचारलं असता त्यांनी मनोहर जोशी आणि उद्धव ठाकरे या दोघांशीही झाल्या प्रकाराबाबत चर्चा करणार असल्याचं सांगितलं. पण जोशी प्रकरण हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असल्यानं सध्या त्यावर भाष्य करणार नाही असं मुंडेंनी स्पष्ट केलं.

close