..तरीही सोनिया गांधी लोकसभेत हजर होत्या -राहुल गांधी

October 17, 2013 7:14 PM0 commentsViews: 482

rahul gandi on bjp17 ऑक्टोबर :जर कुणी उपाशी असेल तर विकासाची मुद्दा होऊच शकत नाही. ही लोकं विचार करतात, आदिवासी लोकांना बाजूला करुन रस्ते बनवाचे आणि या रस्त्यांवरुन महागड्या गाड्या धावत सुटणार याला ही लोक विकास म्हणतात अशी टीका राहुल गांधी यांनी मोदींचं नाव न घेता केली.

 

तसंच अन्नसुरक्षा विधेयकाला भाजपने कडाडून विरोध केला पण तरीही त्याविरोधात लढा दिला. अखेर तो दिवस आला. लोकसभेत अन्नसुरक्षा विधेयक सादर करण्याची वेळ आली. त्यावेळी सोनिया गांधी यांची तब्येत ठीक नव्हती. मी सुद्धा तिथेच होतो.

 

त्या ठिकाणी मीच काय कुणीही असतं तर आपल्या आईच्या तब्येतीची काळजी त्याला लागली असती पण तशाही परिस्थिती सोनिया गांधी यांनी लोकसभेत हजर राहून विधेयकाला पाठिंबा दिला पण विधेयकासाठी मतदान करता न आलं नाही याच दुख आहे अशी भावनिक साद काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी घातली. राहुल गांधी मध्यप्रदेशच्या दौर्‍यावर आहेत. शाहदोलमध्ये झालेल्या सभेत राहुल यांनी भाजपवर कडाडून टीका केली.

 

 

close