बोरिवलीतलं रेल रोको करणार्‍या आंदोलकांची जामिनावर सुटका.

February 5, 2009 8:17 AM0 commentsViews: 3

5 फेब्रुवारी, मुंबईबोरिवलीतलं रेल रोको करणार्‍या आंदोलकांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. बुधवारी पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांनी बोरीवली रेल्वेस्टेशनवर रेल रोको केल्यानंतर रात्री उशीरा काही प्रवाशांना रेल्वे पोलिसांनी अटक केली. या मध्ये 19 महिला आणि 13 पुरूषांचा समावेश आहे. यांच्यावर रेल्वे कामात अडथळा आणणं तसच सरकारी मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यांना बोरिवलीच्या न्यायालयात हजर करण्यात आलं .आंदोलन सकाळी साडे नऊला सुरुवात झाली, मात्र आंदोलकांना साडे अकरा वाजता अटक करण्यात आलं. याचदरम्यान रेल्वे वाहतूक सुरळीत झाल्याने प्रवाशांनी प्लॅटफॉर्मवर येण्यास हरकत नाही अशी घोषणाही करण्यात आली होती. त्यामुळे चुकीच्या लोकांना अटक केल्याचं आरोपींच्या वकिलांनी सांगितलं. हा युक्तिवाद मान्य करत न्यायालयानं एक हजार रुपयाच्या वैयक्तिक जामिनावर आरोपींची सुटका करण्यात आली.दरम्यान बोरिवली रेल्वे स्टेशनवर रेल्वे प्रशासनानं चोख बंदोबस्त ठेवला आहे. मोठ्या प्रमाणावर पोलीस स्थानक परिसरात तैनात करण्यात आले आहेत. आज रेल्वे प्रशासन अतिशय पूर्ण कार्यक्षमतेने काम करत असल्याने गाड्या वेळावर सुटत आहेत. मात्र जोपर्यंत रेल्वे प्रशासन या प्रश्नावर कायमस्वरुपी तोडगा काढत नाही, तोपर्यंत हा प्रश्न पूर्णपणे सुटणार नसल्याची प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली आहे.

close