सृष्टी दाभाडे आत्महत्येप्रकरणी तळेगाव बंद

October 17, 2013 9:29 PM0 commentsViews: 1089

talegaon dabhade news17 ऑक्टोबर : एकतर्फी प्रेमातून होणार्‍या त्रासाला कंटाळून सृष्टी दाभाडे या तरूणीने आत्महत्या केली होती या प्रकरणी आज सर्वपक्षीय तळेगाव दाभाडे बंद पुकारण्यात आला होता.

 

मृत तरुणीच्या कुटुंबीयांची राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली. या प्रकरणातल्या आरोपींना कडक शिक्षा व्हावी, अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी यावेळी केली. या प्रकरणी आरोपी आकाश साळवीला अटक करण्यात आली असून तीन पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे.

 

पुण्यातल्या तळेगाव दाभाडे इथं राहणार्‍या सृष्टी दाभाडे हिला आरोपी आकाश साळवी हा एकतर्फी प्रेमातून त्रास देत होता. सृष्टीच्या कुटुंबीयांनी आकाशविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यास गेले असता पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला. यामुळे निराश झालेल्या या तरुणीनं आत्महत्या केली होती. तक्रार देणारे मुलीचे वडील हे आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी खून प्रकरणातले मुख्य आरोपी आहेत.

close