रोहित शर्माची रणजी टीमच्या कॅप्टनपदी निवड

October 17, 2013 9:11 PM0 commentsViews: 766

rohit sharma17 ऑक्टोबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसर्‍या वन डेत 141 रन्सची नॉटआऊट खेळी करणार्‍या रोहित शर्माला मुंबई क्रिकेट असोसिएशनने अनोखी भेट दिलीय. रोहित शर्माची मुंबई रणजी टीमच्या कॅप्टनपदी निवड करण्यात आलीय.

 

मुंबई टीमचा कॅप्टन अजित आगरकरनं निवृत्ती घेतल्यानं ही जागा रिकामी झाली होती. आगरकरच्या नेतृत्वाखाली मुंबईने गेल्या मोसमात 40 व्यांदा रणजी ट्रॉफी पटकावली होती. पण बुधवारी अजित आगरकरनं निवृत्ती जाहीर केलीय.

 

आता 2013-14च्या रणजी हंगामासाठी मुंबई टीमचा कॅप्टन म्हणून रोहित शर्मावर जबाबदारी टाकण्यात आली आहे. रोहित शर्मा सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन डे सीरिज खेळत असल्याने 27 ऑक्टोबरपासून हरियाणाविरुद्ध होणार्‍या रणजी मॅचमध्ये झहीर खान मुंबई टीमचं नेतृत्व करणार आहे.

close