पारख यांनी कोळसा ब्लॉक वाटपाचा निर्णय बदलला !

October 17, 2013 10:48 PM0 commentsViews: 851

p c parakh17 ऑक्टोबर : उद्योजक कुमारमंगलम बिर्ला आणि माजी कोळसा सचिव पी. सी. पारख यांच्याविरोधातल्या एफआयआरमुळे खळबळ माजलीय. उद्योजक चिंतेत आहेत. तर केंद्र सरकारला गुंतवणुकीची काळजी लागलीय. सीबीआयचा हा खळबळजनक एफआयआर आयबीएन-नेटवर्कच्या हाती लागलाय.

 
कोळसा घोटाळ्याप्रकरणी मंगळवारी एक एफआयआर दाखल झाला आणि या एफआयआरनं भारतीय उद्योग जगताला हादरवून टाकलं. या प्रकरणातल्या या 14व्या एफआयआरमध्ये प्रख्यात उद्योजक कुमार मंगलम बिर्ला आणि माजी कोळसा सचिव पी. सी. पारख यांच्यावर आरोप ठेवण्यात आले.

 

 सीबीआयचा 14वा एफआयआर

 

– कोळसा ब्लॉक हिंदाल्को कंपनीला द्यायचा निर्णय रद्द करून तो नेयवेल्ली लिग्नाईट कॉर्पोरेशन लिमिटेडला देण्याचा निर्णय 25 व्या छाननी समितीत घेण्यात आला.
– पण, 2005च्या जुलैलमध्ये बिर्ला आणि पी. सी. पारख यांच्यात बैठका झाल्या आणि छाननी समितीचा निर्णय बदलून हिंदाल्कोच्या बाजूनं निर्णय घेण्यात आला.
– पारख यांनी पदाचा गैरवापर केला आणि हिंदाल्कोला नियमबाह्यपणे मदत केल्याचं एफआयआरमध्ये म्हटलंय.
– आणि त्याला ‘संबंधित अधिकार्‍याकडून’ परवानगी मिळाली
मंजुरी देणारी ही ‘संबंधित अधिकारी’ कोण, हा खरा प्रश्न आहे. त्यावेळी ही संबंधित अधिकारी म्हणजे पंतप्रधान कारण, त्यांच्याकडेच कोळसा मंत्रालय होतं. त्यामुळे पंतप्रधान चांगलेच अडचणीत सापडण्याची शक्यताय. पण, सीबीआय ‘नियमबाह्य मदत’ सिद्ध करू शकेल का, हा खरा प्रश्न आहे.

 
पारख यांच्या प्रमाणेज उद्योजकांची संघटना असलेल्या इंडिया इंकनंही नाराजी व्यक्त केलीय. फक्त उद्योजकच नाही तर सरकारमधल्याही अनेकांनी काळजी व्यक्त केलीय. सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली सुरू असलेला हा तपास नियमांनुसारच सुरू असल्याचं सीबीआयचं म्हणणंय. पण, सीबीआयच्या एक FIRनं उद्योग आणि राजकीय विश्वात खळबळ उडवून दिलीय आणि धोरण लकव्याची चर्चा पुन्हा सुरू झाली. यापुढे सीबीआय समोर सर्वात मोठं आव्हान असणाराय ते भक्कम पुरावे गोळा करण्याचं

 

 

दरम्यान कोळसा खाण वाटप घोटाळ्याला आता आणखी एक वळण लागलंय. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्याबाबतही संशय निर्माण झालाय. पटनायक यांनी हिंदाल्कोसाठी शिफारस केली होती, अशी माहिती सीबीआयच्या सूत्रांनी दिलीय. ओडिशातला तालाबिरा कोल ब्लॉक हिंदाल्कोला देण्यासाठी पटनायक यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिलं होतं, असं समजतंय.

close