दसरा मेळाव्यातला प्रकार पूर्वनियोजित -जोशी

October 18, 2013 4:26 PM0 commentsViews: 2714

Image img_75672_manaoharjoshi_240x180.jpg18 ऑक्टोबर : 18 ऑक्टोबर : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात अपमाननाट्यानंतर अज्ञातवासात गेलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी मुंबईत परतले आहे. मेळाव्यात घडलेला प्रकार हा पूर्वनियोजित होता असा आरोप मनोहर जोशी यांनी केलाय.

 

मेळाव्याला जाण्याअगोदर मला सांगण्यात आलं होतं की, मेळाव्यात काही तरी गडबड होईल पण मेळाव्याच्या प्रति माझीही भावना होती म्हणून मी मेळाव्यात गेलो पण जे घडलं त्यांचं मला दुख आहे असंही जोशी म्हणाले. तसंच मी चुकलेलो नाही, मी शिवसैनिक आहे आणि शिवसैनिकच राहीन, असंही जोशी सांगितलं.

 

जोशी यांनी मुंबईत परतल्यानंतर गुरुवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एक पाठवलं आहे. उद्धव ठाकरे यांच्यासमोर सत्य परिस्थिती मांडणं हे माझ काम आहे. म्हणून मेळाव्यातल्या घडलेल्या प्रकाराबद्दल आपण हे पत्र लिहिल्याचं मनोहर जोशी यांनी सांगितलंय. आपण उद्धव ठाकरे यांच्या उत्तराची वाट पाहत आहोत, असंही मनोहर जोशी म्हणालेत.दसरा मेळाव्यातल्या प्रकारानंतर जोशी 2 ते 3 दिवस नॉट रिचेबल होते.गुरूवारी रात्री ते मुंबईत परतलेत आण त्यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं.

close