कोल्हापुरात पुन्हा टोलवसुली सुरू

October 18, 2013 4:39 PM1 commentViews: 461

kolhapur toll update18 ऑक्टोबर : कोल्हापूरमध्ये टोल विरोधात एककीकडे आंदोलनचा वणवा पेट घेत आहे तर दुसरीकडे आंदोलन डावलून टोल सुरू करण्यात आले आहे. आज कडक पोलीस बंदोबस्तात पुन्हा टोलवसुली सुरू झालीय.

 

कोल्हापुरात एकूण 9 टोलवसुली नाके आहेत, त्यातल्या पाच नाक्यांवर टोलवसुली सुरू आहे. आयआरबीचे कर्मचारी टोल नाक्यांवर दाखल झालेत. टोलविरोधी कृती समितीने या मुद्द्यावर बुधवारी कोल्हापूर बंदचं आयोजन केलं होतं. आणि टोलवसुली करण्याचा आयआरबीचा प्रयत्न हाणून पाडला होता.

 

पण आज पुन्हा वसुली सुरू झाल्यानं आंदोलन पुन्हा भडकण्याची शक्यता आहे. दरम्यान, टोलविरोधी कृती समितीची आज संध्याकाळी 5 वाजता तातडीची बैठक आहे. यात आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाणार आहे. टोलविरोधी कृती समिती जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हाधिकार्‍यांचीही भेट घेणार आहे.

 

दरम्यान, विधिमंडळात आश्वासन दिल्याप्रमाणे येत्या दोन महिन्यात नवं टोल धोरण अमलात आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. त्यासाठी दोन सचिवांची समितीही नेमण्यात आली आहे. सध्याच्या धोरणात महत्वाचा बदल आवश्यक आहे तो म्हणजे दर तीन वर्षांनी टोलचे दर कमी करण्याचा प्रस्तावाचा विचार ही समिती करत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. नियोजन खात्याचे अतिरिक्त मुख्यसचिव के पी पक्षी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग सचिव श्यामल मुखर्जी यांची ही समिती दोन महिन्यात अहवाल सरकारला देणार आहे.

  • ani

    raste hi jar lokankadun paise gheun bandhnar asal tar mag tax(employee,goods,jakat,import export etc) kashala gheta…sarkar kashala chalvata…

close