नाशिकमध्ये वीजबिलांची होळी

October 18, 2013 1:51 PM0 commentsViews: 120

nasik news18 ऑक्टोबर : नाशिकमध्य वीजदरवाढीच्या निषेधार्थ वीजबिलांची होळी करण्यात आलीए. नाशिकमधल्या वेगवेगळ्या ग्राहक आणि उद्योजक संघटना यात सहभागी झाल्या होत्या.

 

वीजेच्या या दरवाढीचा फटका सामान्य ग्राहक आणि शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणावर बसणार असल्याच्या तक्रारी यावेळी व्यक्त करण्यात आल्यात. राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे उद्योग जगतालाही त्याचा फटका बसत असल्याच्या प्रतिक्रिया या आंदोलनात सहभागी उद्योजकांच्या संघटनांनी केल्या.

 

नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं. ऊर्जा खात्यातल्या भ्रष्टाचारामुळे ही दरवाढ झाल्याचा आरोप भाजपनं केलाय.

close