शरद पवारांच्या नावावर आज शिक्कामोर्तब

October 18, 2013 2:40 PM0 commentsViews: 364

sharad pawar MCA18 ऑक्टोबर : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणूक आज रंगणार आहे. पण ही निवडणूक एक औपचारीकता पूर्ण करण्यासाठी इतकीच राहिली आहे. निवडणुकीआधीच शरद पवार बिनविरोध निवडून आले आहेत.

 

बाळ म्हाडदळकर, क्रिकेट फर्स्ट आणि प्रोफेसर रत्नाकर शेट्टी या तीन पॅनेलचे उमेदवार निवडणुकीला उभे असले तरी तिनही पॅनेलकडून अध्यक्षपदासाठी शरद पवार यांना पाठिंबा देण्यात आलाय. त्यामुळे शरद पवार यांच्या अध्यक्षपदावर आज शिक्कामोर्तब होणार आहे.आज दुपारी तीन वाजता मतदानाला सुरुवात झाली असून केंद्रीय मंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मनसे आमदार नितीन सरदेसाई, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मतदानाचा हक्क बजावलाय. एमसीएच्या 17 जागांसाठी एकूण 40 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

 

उपाध्यक्ष, खजिनदार, संयुक्त सचिवपद आणि कार्यकारिणीत कोणत्या पॅनेलचे उमेदवार निवडून येतात याची उत्सुकता लागली आहे. दरम्यान, एमसीए अध्यक्षपदाचा अर्ज बाद ठरवल्यानं भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी या निर्णयाविरोधात कोर्टात धाव घेतली आहे. आज दुपारी गोपीनाथ मुंडेंनी सिटी सिव्हिल कोर्टात याचिका दाखल केलीय. निवडणूक पुन्हा होईपर्यंत शरद पवारांना अध्यक्षपदावर काम करू देऊ नये अशी मागणी गोपीनाथ मुंडे यांनी याचिकेद्वारे केलीय.

close