जोशींनी उद्धव ठाकरेंना मदत करावी-आठवले

October 18, 2013 3:30 PM0 commentsViews: 769

18 ऑक्टोबर : मनोहर जोशी हे शिवसेनेत आदरणीय नेते आहे. उद्धव ठाकरे यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी जोशी यांच्यावर आहे. त्यांनी उद्धव यांना मार्गदर्शन करावे असा सल्ला आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिलाय. तसंच जोशी यांनी शिवसेनेतच राहून काम करावं अशी विनंतीही आठवले यांनी केली. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करून वादळ उठवलं होतं. मात्र त्यांच्या प्रश्नाला कोणतही उत्तर न देता उद्धव यांनी शिवसैनिकांच्या कृतीतून जोशींना चांगलाच ‘धडा’ शिकवला. दसरा मेळाव्यात मनोहर जोशी व्यासपीठावर पोहचल्यानंतर शिवसैनिकांनी ‘मनोहर जोशी हाय हाय’ घोषणा देऊन जोशींना घरचा रस्ता दाखवला होता. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आलंय. महायुतीचा मित्रपक्ष आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी आज या सर्व प्रकरणावर जोशींना सबुरीचा सल्ला दिलाय.

close