मानवी जीवनाचा -हास करू नका – सुंदरलाल बहुगुणा

February 5, 2009 8:19 AM0 commentsViews: 5

5 फेब्रुवारी, रत्नागिरी कोकण किनारपटीवर येऊ घातलेल्या तब्बल अकरा औष्णिक वीज प्रकल्पांविरोधात रत्नागिरीमध्ये भूमिपूत्रांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सुप्रसिद्ध अशा चिपको आंदोलन सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा हे सध्या रत्नागिरीत दाखल झालेत. यापुढचे तीन दिवस सुंदरलाल बहुगुणा रत्नगिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या भुमिपुत्रांना भेटणार आहेत. यापूर्वी त्यांनी अनेक ठिकाणच्या पर्यावरणाला हानी पोहचवणार्‍या प्रकल्पांना कडाडून विरोध केलेला आहे. या प्रकल्पांना उद्देशून सुंदरलाल बहगुणा म्हणाले, " आपल्या संविधानानं आपल्या सर्वांना जगण्याचा प्राथमिक अधिकार दिला आहे. हे कोकण किनारपट्टीवर उभे राहिलेले सर्व औष्णिक वीज प्रकल्प आपल्या जगण्याचा अधिकार नष्ट करत आाहेत. कारण या प्रकल्पांच्या काही मार्यादा आहेत. पर्यावरणाचा, मानवी जीवनाचा -हास न होता विकास होईल, असे विकास प्रकल्प असायला हवेत. पृथ्वीवरचं पाणी, जमीन आणि जंगल यांचा फायदा आपल्या सर्वांना मिळायला हवा. आमचं माणूस असणं हा गुन्हा आहे का, की आमच्याकडून आमची हक्काची जंगल आणि जमीन हिसकावून घेतली जात आहे? " सुंदलाल बहुगुणा यांच्या शब्दांनी भूमिपुत्रांच्या किनारपट्टी बचाव आंदोलनाला नक्कीच लढण्याचं पाठबळ मिळणार आहे.

close