भाजपचं नागपुरात राष्ट्रीय अधिवेशन

February 5, 2009 4:52 AM0 commentsViews: 2

5 फेब्रुवारी, नागपूरप्रशांत कोरटकर भारतीय जनता पार्टीचं राष्ट्रीय अधिवेशन 6 फेब्रुवारी पासून नागपुरात सुरू होतहोत आहे. तीन दिवस चालणार्‍या या संमेलनाची तयारी जोरात सुरू आहे. भाजपचे सर्व राष्ट्रीय नेते, पदाधिकारी त्यासाठी नागपुरात पोहचत आहेत.नागपूरच्या सिव्हील लाईन्स परिसरातील विद्यापीठच्या सुभेदार मैदानावर भाजपाच्या राष्ट्रीय संमेलनाची तयारी जोरात सुरू आहे. 6 ते 8 फेब्रूवारी दरम्यान होणार्‍या या अधिवेशनासाठी 53 हजार स्क्वेअर फुटांचा मंडप तयार करण्यात येतोय. आठ वर्षा पूर्वी केंद्रात एन डी ए च सरकार असतांना नागपुरात राष्ट्रीय अधिवेशन झाल होतं. त्यावेळी बंगारू लक्ष्मण यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. अधिवेशनात देशभरातून भाजपचे 178 खासदार, 6 राज्यांचे मुख्यमंत्री आणि 1100 आमदार उपस्थित राहणारेत. तसच 30 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातील भाजपाचे पदाधिकारी सामिल होणार आहेत. त्यासाठी शहरात 150 स्वागत गेटस्, 105 मोठे होडीर्ंग्स , तर 25 हजार पोस्टर्स लावण्यात आलीयेत. नागपुरात संघाच मुख्यालय आहे. निवडणूकीतील उमेदवार निवडीत संघाच मतही जाणून घेतल जाईल असे अंदाज वर्तवले जात आहेत.अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी नागपुरातील यशवंत स्टेडीयम वर भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी आणि अध्यक्ष राजनाथ सिंह यांची जाहिर सभा आहे. ही सभा म्हणजे लोकसभेसाठी भाजपाचा शंखनाद असेल, हेही स्पष्टच आहे.

close