‘युथ इज पॉवर’,मोदींचं युवाकार्ड

October 19, 2013 2:24 PM0 commentsViews: 390

19 ऑक्टोबर : गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा युवा कार्ड पुढे केलंय. तरुणांना बळ द्यायला हवं, ते देशाचं नेतृत्व करतील पण काही लोक तरूणाईकडे पॉवर साठी पाहत आहे पण आम्ही त्यांच्याकडे युथ आणि पॉवर म्हणून पाहत आहोत अशी टीका नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांचं नावं न घेता केली. तसंच आज देशातील आर्थिक स्थिती बिकट असून त्यातून बाहेर पडण्यासाठी तरूणांना संधी देण्याची गरज आहे असंही ते म्हणाले. गांधीनगरमधल्या पंडित दीनदयाल विद्यापीठाच्या दीक्षांत संमारंभात ते बोलत होते.

close