मंदीमुळे आयटीमधल्या नोकर्‍यांवर कुर्‍हाड

February 5, 2009 9:09 AM0 commentsViews: 13

5 फेब्रुवारी, मुंबईकृतिका सक्सेनाआय.टी सेक्टरवर मंदीची कुर्‍हाड चालली आणि अनेक आय.टी कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात सुरू झाली. येत्या वर्षभरातही आय.टीमध्ये नोकरीसाठी विशेष संधी उपलब्ध नसणार आहेत. इन्फोसिस, टिसीएस आणि विप्रो या दिग्गज आय.टी कंपन्यांनी घेतलेल्या आढाव्यातून असा अंदाज व्यक्त होतोय. यावरच आहे आयबीएन-लोकमतचा हा स्पेशल रिपोर्ट.आयटी सेक्टरमध्ये नव्या नोकर्‍यांच्या नावाने बोंबाबोंब आहे. नवीन भरती थांबलीय. पगारवाढीची गोष्ट तर कोसो मैल दूर राहिलीय. आहे त्या पगारातही घट होतेय. ज्याच्यात मंदी नाहीये अशी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे कर्मचार्‍यांची चिंता. विप्रोसारख्या बड्या आय.टी कंपनीची अवस्था पाहा… तिसर्‍या तिमाहीत त्यांच्या आय.टी विभागातून 361 कर्मचार्‍यांना डच्चू मिळालाय तर बीपीओ विभागातून 226 कर्मचार्‍यांना. विप्रोनं 6000 फ्रेशर्सना ऑफर दिली होती. पण विप्रोनं तात्पुरतं शटर लावून घेतलंय आणि त्यांच्या जॉईनिंग डेट्स पुढं ढकलल्यात. इन्फोसिसमध्येही भरतीचं प्रमाण दुसर्‍या तिमाहीपासून निम्म्यानं घटलंय. दुसर्‍या तिमाहीत कंपनीनं जवळपास 10 हजार कर्मचारी घेतले होते तर तिसर्‍या तिमाहीत फक्त सहा हजारांचाच नंबर लागला आहे. टीसीएसनं मात्र कर्मचारी संख्या वाढवली आहे. दुसर्‍या तिमाहीत कंपनीनं 9682 कर्मचारी वाढवले होते तर तिसर्‍या तिमाहीत 11,773 कर्मचार्‍यांची भर पडलीय. पण कंपनी सध्या भर देतेय फ्रेशर्सवरच. गलेलठ्ठ पगारांच्या अनुभवी वरिष्ठ अधिकार्‍यांना पदावर घेणं टीसीएसनं थांबवलंय. आणि इन्क्रिमेंट्सदेखील कमी करण्याचा कंपनीचा विचार आहे. तज्ज्ञांच्या माहितीप्रमाणे या शैक्षणिक वर्षात सहा लाख फ्रेशर्स इंजिनअरिंगची डिग्री घेऊन बाहेर पडतील. पण यापैकी नशीब उजळेल फक्त 50 टक्क्यांचंच. "जॉबमार्केटमध्ये मोठी दरी पडणार आहे. सुमारे चार लाखांपैकी दहा टक्के जरी म्हटलं तरी खूपजणांना नोकर्‍या मिळणार नाहीत आणि मला वाटतं 20 ते 30 हजारजणांनाच नोकर्‍या मिळू शकतील. म्हणूनच ही गॅप 50%.इतकी असू शकेल." असं सेल्स इमेचे संचालक रोहित रामानी यांनी सांगितलं.2009 सालात सुमारे सहा लाख आय.टी ग्रॅज्युएट्स शिकून नोकरीच्या शोधात बाहेर पडतील. पण आय.टी सेक्टरला सध्यातरी नवीन ऑफर्स देणं परवडणारं नाहीये. त्यामुळे कितीही आशावादी राहिलं तरी साधारण तीस हजार जणांनाच नोकरीची संधी मिळू शकेल तेव्हा एक तर नोकरीचं क्षेत्र बदला किंवा मंदीची लाट ओसरेपर्यंत थांबा, असे दोनच पर्याय त्यांच्यापुढे शिल्लक आहेत.

close