आता निवडणुका झाल्या पाहिजे असं म्हणण्यात काय तथ्य-मुंडे

October 19, 2013 2:46 PM0 commentsViews: 809

19 ऑक्टोबर : शरद पवारांच्या माणसांनीच माझा अर्ज बाद केला याच्यापेक्षा मोठं नाट्य कोणतं. आता पवार जरी निवडणूक व्हायला हवी होती असं जरी म्हणत असले पण आता असं म्हणण्यात काही तथ्य नाही असं प्रतिउत्तर भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे पवारांना दिलंय. नाशिकमध्ये भाजप मेळाव्यानिमित्त आलेल्या गोपीनाथ मुंडेंनी पवारांवर टीका केली. मोदींनी नाही तर पवारांनी पंतप्रधानपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधलंय. पण,पवारांचे स्वप्न पुर्ण होणार नाही, असंही मुंडेंनी म्हटलंय. एमसीएच्या अध्यक्षपदी शरद पवार यांची निवड झाली त्यानंतर आज नवी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत पवारांनी मुंडे आणि माझ्यात एमसीएची निवडणुकी झाली पाहिजे होती तर खरं काय ते समोर आलं असतं असा टोला पवारांनी लगावला होता.

close