असा सुरु आहे दाभोलकरांच्या खुनाचा तपास, तरीही मारेकरी मोकाटाच !

October 19, 2013 1:59 PM1 commentViews: 835

अद्वैत मेहता,पुणे
19 ऑक्टोबर : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला उद्या 20 ऑक्टोबरला 2 महिने पूर्ण होतील. पण, पोलीस अजून ना हल्लेखोरांना पकडू शकलेत ना सूत्रधारांना..गुन्ह्याची व्याप्ती प्रचंड आहे.आणखी वेळ द्या, नक्की छडा लावू, एवढं एकच उत्तर पोलीस देत आहेत. तपास कुठवर पोचलाय आणि तपासातल्या अडचणी काय, यावरचा हा रिपोर्ट…
मंगळवार, 20 ऑगस्ट..सकाळची वेळ…पुण्यातल्या ओंकारेश्वर मंदिराजवळच्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर मॉर्निंग वॉकला बाहेर पडलेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा गोळ्या झाडून खून करण्यात आला. त्यानंतर अवघ्या 2 तासात खुद्द मुख्यमंत्र्यांनी हल्लेखोरांची माहिती देणार्‍यास 10 लाखाचं इनाम जाहीर केलंं. पण 2 महिने होत आले तरी पोलीस हल्लेखोरांना जेरबंद करू शकले नाहीत.
गेल्या 30-40 वर्षातली ही सर्वात व्यापक तपास मोहीम आहे ज्यात राज्यात तसंच राज्याबाहेर तपास केला जातोय.

 • - तब्बल दोन कोटी फोन कॉल्सचा डेटा तपासला गेला
 • - 80 सी.सी. टी.व्हीचं फुटेज तपासलं गेलं
 • - 3000 वाहनांची तपासणी करण्यात आली
 • - साक्षीदारांच्या माहितीवरून दोन आरोपींची रेखाचित्र
 • - अशा अनेक संस्था आणि व्यक्तींकडे चौकशी
 • - जवळपास 2000 सराईत गुन्हेगांची चौकशी करण्यात आलीय

दाभोलकर हत्येचा तपास करायला एनआयएनं नकार दिलाय तर सीबीआयकडे 10 हजार प्रकरणं प्रलंबित आहेत. त्यामुळे महाराष्ट्र
पोलीसच तपास करणार यावर शिक्कामोर्तब झालंय. या सर्व कारणांमुळे दाभोलकर हत्येचा तपास कधी लागणार, यावर प्रश्नचिन्हं निर्माण झालीय.

 • Sandesh Bhagat

  Evdha tapas karunahi jr aropi sapdat nasel tar tapasachi disha chukichi ahe……..
  kinva aropi khup mothya sanghatneshi sambadhit asava……

close