सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्यांना गरिबी काय कळणार -मोदी

October 19, 2013 6:04 PM0 commentsViews: 1330

narendra modi on rahul gandhi19 ऑक्टोबर : उत्तर प्रदेशातल्या कानपूरमध्ये आज भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी प्रचाराचं नारळ फोडलं. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गरिबांची थट्टा उडवलीय. पण सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेल्यांना गरिबी काय कळणार असं सांगत नरेंद्र मोदींनी राहुल गांधींवरही तोफ डागली.

 

तसंच कोळसा घोटाळ्यात पंतप्रधानांचे हात काळे आहेत अशी टीकाही मोदींनी केलीय. तसंच 2014 मध्ये केंद्रात सत्तेत यायचं असल्यास उत्तरप्रदेशात भाजपला जास्तीत जास्त जागा जिंकाव्या लागणार असल्याचं सांगत नरेंद्र मोदींना काँग्रसवर जोरदार हल्लाबोल केला. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेशातली त्यांची ही पहिलीच सभा होती.

 

कानपूर इथं झालेल्या सभेत नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडले. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी काँग्रेस सरकार कोणती तरी घोषणा करून नंतर विसरून जाते. मागील निवडणुकीत 100 दिवसात महागाई कमी करण्याचं वचन या काँग्रेस सरकारनं दिलं होतं. पण याच्या उलट झालं महागाई आज प्रचंड वाढलीय. महागाईला सरकारचं जबाबदार असून महागाईबाबत सोनिया गांधी,पंतप्रधान बोलत नाहीत, कारण त्यांना जनतेविषयी आत्मियता नाही.

 

गेल्या 60 वर्षांपासून काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी जनतेचे हाल केले आहे अशी टीकाही मोदींनी केली. तसंच या निवडणुकीत या सरकारचा पराभव करून चांगलाच धडा शिकवावा लागणार आहे जेणे करून जनतेचे हाल करणे काय असतं आणि त्याची शिक्षा काय असते हे त्यांना कळालं पाहिजे. या सरकारला संसदेत वाचवणारे घटक पक्ष ही तितकेच जबाबदार आहे. संसदेत मागच्या दारातून सरकारला पाठिंबा द्यायचा आणि तोंडावर भलतंच काही बोलायचं असं हे सरकार युपीच्या सत्तेवर विराजमान आहे अशी टीका मोदी यांनी मुलायम सिंग यादव यांचं नाव न केली.

 

भव्य रॅलीचं आयोजन

 

उत्तरप्रदेश हे देशातील राजकारणाचं महत्त्वाचं केंद्र..म्हणून भाजपने नरेंद्र मोदींच्या रॅली आणि सभेसाठी जोरदार बांधणी केली होती. कानपूर येथील इंदिरानगरमध्ये मोदींच्या रॅलीसाठी 100 फूट लांब आणि 30 फूट रुंद असं भव्य व्यासपीठ उभारण्यात आलं होतं. मोदींचं भाषण मैदानावरील लोकांना व्यवस्थित ऐकता यावं यासाठी 100 एलईडी स्क्रिन लावण्यात आल्या होत्या. यावेळी व्यासपीठावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह, भाजपचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह आणि इतर नेते हजर होते. या रॅलीला ‘शंखनाथ रॅली’ असं नाव देण्यात आलं होतं. एवढंच नाही तर फेसबुक, ट्विटर या सोशल साईटसवरून एक नंबर डायल करून थेट मोदींचं भाषण ऐकण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती.

 

close