जिद्दीपुढे आकाश ठेंगणं !

October 19, 2013 9:22 PM0 commentsViews: 565

19 ऑक्टोबर : जिद्द या दोन ‘अक्षरां’च्या बळावर कुणी काय करू शकतं याचा नेम नाही. अशीच एक जिद्दीची गाथा आहे चित्रकार शीला शर्मा या अपंग तरूणीची.. दोन्ही हाताने अपंग असलेल्या शीला शर्मा यांनी पायाच्या सहाय्याने जगाला शांततेचा संदेश देणारे गौतम बुद्धांच्या उपदेशांच्या गांथांची 100 सुंदर चित्रं तयार केली आहेत. यातल्या निवडक 25 चित्रांचं प्रदर्शन ‘बुद्धास आर्ट वर्ल्ड’ या संस्थेनं मुंबईच्या वेस्ट वर्ल्ड शोरूममध्ये या आठवड्यात भरवलंय. शीला शर्मा यांना ही 25 चित्र तयार करण्यासाठी तीन महिन्याचा कालावधी लागला. तीच्या या चित्रांचं आणि तिच्या जिद्दचं सर्वत्र कौतुक होत आहे.

close