मनोहर जोशी शिवसेना सोडणार नाही -पवार

October 19, 2013 11:23 PM0 commentsViews: 2717

19 ऑक्टोबर : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी हे कधीही शिवसेना सोडणार नाहीत असं भविष्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी वर्तवलंय. जोशी हे सेनेतले फार जुने कार्यकर्ते आहेत. मी जेवढा त्यांना ओळखतो, त्यावरुन ते पक्ष सोडणार नाहीत असंही पवार यांनी स्पष्ट केलं. नवी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

 
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात अपमाननाट्याला कारणीभूत ठरण्यापैकी एक कारण होतं ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मनोहर जोशी यांची दिल्लीत झालेली भेट. या भेटीनंतर जोशी यांनी एका कार्यक्रमातून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. त्यानंतर दसर्‍या मेळाव्यात शिवसैनिकांनी ‘चले जावो’ घोषणा दिल्यामुळे जोशींना मेळाव्याच्या व्यासपीठावरून पायउतार व्हावे लागले होते. या प्रकरणावर सेनेनं आता यावर बोलण्याची योग्य वेळ नाही असी प्रतिक्रिया दिली.पण जोशी यांनी घडलेला प्रकार हा पूर्वनियोजित कट होता असा आरोप केलाय.

 

 

आता या संपूर्ण अपमाननाट्यावर शरद पवार यांनी आपली बाजू मांडलीय. दिल्लीत अनेक शिवसेनेचे नेत मला भेटत असतात. असा कोणताही एक दिवस असा गेला नाही की, शिवसेनेचे नेते मला भेटले नाही. मी ज्या सत्तेवर आलो त्या दिवशी शपथ घेतली ती, सर्व घटक पक्षांसाठी घेतलीय. हा विकासासाठी आणि लोकांचा प्रश्न आहे. तो पहिला लोकप्रतिनिधी आहे नंतर त्या पक्षाचा प्रतिनिधी आहे असंही पवार म्हणाले. जोशींनी सेनेत मिळलेल्या वागणुकीमुळे ते सेनेतून बाहेर पडतील, राज्यसभेच्या जागेसाठी जोशींनी उद्धव यांच्यावर टीका केली, शरद पवार यांची भेट अशा वेगवेगळ्या चर्चेला उधाण आलं होतं. आता  मात्र पवारांनी या प्रकरणावर आपली बाजू मांडतं प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय.

close