धोणी-गंभीरने डाव सावरला

February 5, 2009 9:44 AM0 commentsViews: 2

5 फेब्रुवारी, श्रीलंका भारत आणि श्रीलंके दरम्यान कोलंबो इथं सुरु असलेल्या चौथ्या वन डे खराब सुरुवातीनंतर कॅप्टन धोणी आणि गौतम गंभीर यांनी इनिंग सावरली आहे. भारताने आज टॉस जिंकून पहिली बॅटिंग घेतली. सेहवागने इनिंगची सुरुवातही खणखणीत फोर मारुन केली. पण कुलसेखराच्या बॉलिंगवर अप्रतिम कॅच घेत जयसूर्याने त्याची इनिंग संपवली. सेहवागने पाच रन्स केले.सेहवाग आऊट झाल्यावर कॅप्टन धोणी आज वन डाऊन खेळायला आला. आणि जबाबदारीने बॅटिंग करत गंभीर बरोबर त्याने सेंच्युरी पार्टनरशिप केली. दोघांनी आपली हाफ सेंच्युरी पूर्ण केलीय. दोघांमध्ये धोणी जास्त आक्रमक होता. हाफ सेंच्युरीमध्ये त्याने दोन शानदार सिक्स मारले.

close