सचिनच्या 199 टेस्टसाठी ईडन गार्डन सज्ज

October 21, 2013 3:29 PM0 commentsViews: 1412

sachin in wankhede21 ऑक्टोबर : जगातील सर्वोत्तम क्रिकेट स्टेडियम्समध्ये ज्या ग्राऊंडचा उल्लेख होतो ते ईडन गार्डन्स भारत विंडीज दरम्यानच्या पहिल्या टेस्टसाठी सज्ज झालंय. पण ही टेस्ट महत्वाची आहे ती सचिन तेंडुलकरसाठी. मास्टर ब्लास्टरची ईडन गार्डन्सवरची ही शेवटची टेस्ट असेल. त्यामुळे ही टेस्ट संस्मरणीय करण्यासाठी बंगाल क्रिकेट असोसिएशननं जय्यत तयारी केली आहे.

मुंबईतील अखेरच्या टेस्ट अगोदरच कोलकाता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला निरोप द्यायला सज्ज झालंय. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर सचिन आपली 199 वी मॅच खेळणार आहे. आणि यासाठी बंगाल क्रिकेट असोसिएशन जोरदार तयारी करतंय. पण मुंबई क्रिकेट असोसिएशन त्यांच्या युक्त्या चोरल्या जातील या भीतीनं कुणीही याची जास्त वाच्यता करत नाहीये हा यातील गंमतीचा भाग.

सचिनसाठी ठरवलेल्या कार्यक्रमात काही खास गोष्टींचा समावेश

 • - सचिनचा सत्कार करण्यासाठी सचिनबरोबर खेळलेल्या 11 दिग्गज खेळाडूंना बोलावण्याचा सीएबीचा मानस आहे
 • - पहिल्या दिवसाच्या तिकीटावर सचिनचं रेखाचित्र काढण्याचं सीएबीनं ठरवलंय. बंगालचे प्रसिद्ध चित्रकार जोगेन चौधरी हे चित्र काढतील असं कळतंय
 • - इतर चार दिवसांच्या तिकीटांवर ईडन गार्डन्सवर सचिननं ठोकलेल्या 3 सेंच्युरीचं चित्र असेल
 • - या मॅचदरम्यान सर्व प्रेक्षकांना सचिनचे मुखवटे पुरवण्यात येणार आहेत
 • - तर मॅचच्याअगोदर एका खास एअर शोचंही आयोजन करण्यात आल्याचं कळतंय
 • - तर या सोहळ्यासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राज्यपाल एम के नारायणन त्याचबरोबर शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांनाही बोलावण्याचा सीएबीचा मानस असल्याचं कळतंय
 • - त्याचबरोबर सचिनला देणारी ट्रॉफीही खास असेल असं आयोजकांकडून सांगण्यात येतंय.

पण या मॅचसाठी खास विकेट तयार करण्यावर सीएबीचा भर असेल. त्यामुळे सचिनची ईडन गार्डन्सवरची ही मॅच संस्मरणीय होणार हे नक्की.

सचिनसाठी खास आयोजन

 • - सचिनसोबत खेळलेल्या 11 दिग्गज खेळाडूंना निमंत्रण
 • - पहिल्या दिवसाच्या तिकिटावर सचिनचं रेखाचित्र
 • - इतर तिकिटांवर सेंच्युरीवीर सचिनचे फोटो
 • - सर्व प्रेक्षकांना सचिनचे मुखवटे
 • - मॅचअगोदर खास एअर शोचं आयोजन
 • - राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री आणि अनेक मान्यवरांना निमंत्रण
 • - सचिनला देणार खास ट्रॉफी
close