शोभन सरकार यांच्या ‘स्वप्ना’चा आदर, मोदींचं घूमजाव

October 21, 2013 4:03 PM1 commentViews: 972

Image modi345234_300x255.jpg21 ऑक्टोबर : उत्तरप्रदेशमध्ये उन्नावमध्ये सुरू असलेल्या स्वप्नातल्या सोन्यासाठी खोदकामावरून राजकारण सुरू झालंय. गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी ‘स्वप्नातल्या सोन्याच्या’ शोधावर अगोदर टीका केली आता मात्र त्यांनी घूमजाव केलंय. लाखो भाविकांचा शोभन सरकार यांच्यावर विश्वास आहे. मला त्यांच्याबद्दल आदर आहे. परदेशी बँकांमध्ये लपवलेल्या काळ्या पैशांबद्दल श्वेतपत्रिका काढावी अशी माझी सरकारला विनंती आहे असं स्पष्टीकरण मोदी यांनी दिलंय.

 

शोभन सरकार या साधूला स्वप्न पडल्यानंतर सरकारनं सोन्याच्या शोधासाठी खोदकाम सुरू केल्याची टीका होतेय. यात नरेंद्र मोदींही उडी घेतली. स्वप्नातलं सोनं शोधण्यापेक्षा स्वीस बँकेतला काळापैसा भारतात आणावा अशी टीका केली होती. तसंच मोदींच्या या टीकेनंतर त्याला उत्तर म्हणून शोभन सरकार यांनी मोदींनी खुलं पत्र लिहिलंय.

 

देशाला महासत्ता बनवण्यासाठी शोभन सरकार यांनी सोन्याची माहिती सरकारला दिली असा दावा त्यांचे सहकारी ओमजी बाबा यांनी आयबीएन नेटवर्कशी बोलताना केलाय. त्यानंतर नरेंद्र मोदींनी ट्विट करून माघार घेतली. आपण शोभन सरकार यांच्या समर्थकांच्या भावनांचा आदर करत असल्याचं त्यांनी त्यात म्हटलंय. दरम्यान, वैज्ञानिक पद्धतीनं सर्वेक्षण करूनच हे खोदकाम केलं जात असल्याचं सरकारचं म्हणणं आहे.
मोदींनी काय ट्विट केलंय?
लाखो भाविकांचा शोभन सरकार यांच्यावर विश्वास आहे. मला त्यांच्याबद्दल आदर आहे. परदेशी बँकांमध्ये लपवलेल्या काळ्या पैशांबद्दल श्वेतपत्रिका काढावी अशी माझी सरकारला विनंती आहे.

  • namuchi

    फेकू मोडी घाबरला…त्या चिट्ठी मध्ये अनेक प्रश्न होते – फेकू मोडीच्या सभेसाठी जो पैसा खर्च होतो तो पैसा काळा कि अधिकृत?…आता इथे दैत्य मोडीचे आंधळे भक्त म्हणतील कि फेकू मोडी च्या सभेला ticket असते…पण किती पैसे जमा झाले हे मात्र सांगत नाही कारण मग खरा आकडा कळेल…बर जेवढे खर्च केले तेवढे जमा झाले का?…कशाचेच उत्तर नाही पण दहशतवादी मोडी ची लाट आहे म्हणे…ज्या social media चा हा मोठ्या प्रमाणावर वापर करतो त्या computerisation ला दारुड्या भाजपायी आणि भाजप ने विरोध केला होता…ती चूक आहे हे हा फेकू मोडी मान्य करील का?…NDA ची सत्ता असताना काळ्या पैशा बाबत त्यांनी केले काय?…bofors बाबत केले काय?…जर त्यांना माहित आहे कि अमुक एक गुन्हेगार आहे तर मग त्यांना पकडले का नाही?…जनतेचे ६०० कोटी खर्च केले…आणि शेवटचा प्रश्न – त्या सलवार बाबाने ज्या जमिनी लाटल्या आहेत त्याबद्दल भ्रष्टाचारी मोडी गप्प का?…ह्या सर्व प्रश्नांचे उत्तर नसल्यामुळे फेकू मोडी ने सपशेल शरणागती पत्करली…असो…२०१४ नंतर दहशतवादी मोडी साबरमती जेल मध्ये असणार आहे…

close