सरकारदरबारी शहीद म्हणून दखलच नाही !

October 21, 2013 2:27 PM1 commentViews: 720

21 ऑक्टोबर :ऐ मेरे वतन के लोगो, जरा आँख में भर लो पानी हे गाणं ज्यावेळी लता मंगेशकरांनी गायलं, त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या डोळ्यातही अश्रू आले होते. कोल्हापूर जिल्ह्यातल्या मासा बेलेवाडी या गावातल्या एका जवानाने देशासाठी वीरमरण पत्करलं. पण त्यांच्या कुटुंबीयांचे अश्रू पुसण्याची साधी तसदीही राज्य आणि केंद्र सरकारला अजून घेता आली नाहीये. ही कहाणी आहे, साताप्पा पाटील या शूरवीर जवानाची.

हा आक्रोश आहे एका वीरपत्नीचा.. कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका सुपुत्रानं देशासाठी बलिदान दिलं. तेही वयाच्या 25 व्या वर्षी. 17 ऑक्टोबरला जम्मू आणि काश्मीरमधल्या केरन सेक्टरमध्ये झालेल्या चकमकीत साताप्पा पाटील शहीद झाले.

19 ऑक्टोबरला शासकीय इतमामात सातप्पांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी कुटुंबीयांचा भेट घेतली. मात्र, जिल्ह्याचे पालकमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी काहीही दखल घेतली नाही.

हे कुटुंब आजही दुःखातून सावरलेलं नाही. मात्र आपल्या मुलाला म्हणावा तसा मानसन्मान मिळाला नाही याची खंत त्यांना आहे. साताप्पा 11 ऑगस्टला सुट्टी संपवून पुन्हा नोकरीवर रूजू झाले होते. त्यावेळी जाताना आपल्या बहिणीकडून त्यांनी राखी बांधून घेतली. साताप्पाच्या कुटुंबाला आर्थिक मदतीची अपेक्षा नाही मात्र सरकारदरबारी त्यांना सन्मान मिळावा हीच अपेक्षा आजही त्यांच्या कुटुंबाला आहे.

  • abhi.aby

    ya deshat paishe walyana, chorana aani bhrashta netyana maan milato. Shahid bichare asach marun jatat!

close