साखर कारखान्यांच्या लिलावांची चौकशी सुरु

October 21, 2013 2:38 PM0 commentsViews: 242

Image img_223632_sugarfactoryinmaharashtra_240x180.jpg21 ऑक्टोबर : सहकारी साखर कारखान्यांच्या लिलावांची चौकशी सुरु आहे असं राज्य सहकारी बँकेनं स्पष्ट केलंय. कारखान्यांच्या लिलावात अफरातफर झालीय का याची चौकशी केली जाणार आहे.

 

या लिलावात कुणावर मेहरनजर झालीय का, याचीही चौकशी केली जाणार आहे. अशा सर्व बाबींची चौकशी करण्यासाठी सहकार कायदा कलम 83 अन्वये ही चौकशी लावण्यात आलीय. त्यासाठी चौकशी अधिकार्‍याची नेमणूकही करण्यात आल्याची माहिती राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना दिलीय.

 

दोन आठवड्यांपूर्वी ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे आणि मेधा पाटकर यांनी सहकारी साखर कारखान्याच्या विक्रीत दहा हजार कोटींचा घोटाळा झाला होता असा आरोप केला होता.

close