रक्तदान करुन ईद साजरी

October 21, 2013 5:08 PM0 commentsViews: 91

21 ऑक्टोबर : मागिल आठवड्यात बकरी ईद साजरी झाली. या सणाला बकर्‍याची कुर्बानी दिली जाते. मात्र पुण्यात मुस्लीम सत्यशोधक समाजानं वेगळ्या पद्धतीनं बकरी ईद साजरी केली. बकर्‍यांचा बळी देण्याऐवजी रक्तदान करुन कार्यकर्त्यांनी ईद साजरी केली. यामधून डॉ.नरेंद्र दाभोलकरांना श्रद्धांजली वाहण्याचा प्रयत्न असल्याचं मुस्लीम सत्यशोधक समाजानं सांगितलं. तसंच काळाप्रमाणं बदलणं हाही या मागचा हेतू असल्याचं सांगण्यात आलं.

close