शाळेचं बांधकाम पाडा, रेल्वे विभागाची नोटीस

October 21, 2013 5:35 PM0 commentsViews: 157

21 ऑक्टोबर : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या 40 वर्षांपूर्वीच्या शाळेचं बांधकाम रेल्वे विभागानं अनधिकृत ठरवलंय आणि ते पाडण्याची नोटीस रेल्वेकडून देण्यात आली आहे. त्यामुळे या शाळेत शिकणार्‍या मुलांचं शैक्षणिक भवितव्य धोक्यात आलंय. पालिकेच्या तुकाराम महाराज प्राथमिक विद्यालय, महर्षी धोंडो केशव कर्वे आणि जगदीशचंद्र बोस या तीन शाळा रल्वेच्या जागेत सुरू आहेत. या शाळा मोडकळीस आल्यानं पालिकेनं तिन्ही शाळा एकत्रित करून नव्यानं बांधकाम करण्यास सुरुवात केलीय. त्यासाठी 35 लाख रुपयांच्या निधीपैकी 16 लाख खर्च करून 4 वर्ग बांधून सुरू झालेत. आता पहिल्या मजल्याचं काम सुरू आहे.

close