ट्रॅव्हल्सवाल्यांची दिवाळी,प्रवाशांचं दिवाळं !

October 21, 2013 8:08 PM0 commentsViews: 595

travel pkgप्रवीण मुधोळकर,नागपूर
21 ऑक्टोबर : शिक्षण आणि नोकरीसाठी बाहेरगावी राहणार्‍यांची दिवाळीनिमित्त घरी जाण्यासाठी दरवर्षी लगबग असते. मात्र रेल्वे आणि एसटीचे पर्याय संपल्यानंतर प्रवाशांना आसरा घ्यावा लागतो तो खासगी बससेवेचा. मात्र या परिस्थितीचा गैरफायदा घेत ट्रॅव्हल एजन्सी प्रवाशांकडून ादुप्पट पैसे आकारत आहे.

 

हा आहे पुण्याचा विशाल लांडे. एमबीए करण्यासाठी तो नागपुरात आलाय. एरवी पुण्याहून नागपूरला जाण्यासाठी साधारण 1200 रुपये बसभाडं असतं. मात्र आता विशालला त्याच प्रवासासाठी 2400 बसभाडं सांगण्याय येतंय. या सगळ्या प्रकारांमुळे विशालसारख्या हजारो प्रवाशांना मनस्ताप करावा लागतोय.
एरवी ऑफ सीझनमध्ये विशेष व्यवसाय होत नसल्यामुळे दिवाळीत दुप्पट पैसे घेण्याशिवाय पर्याय नसल्याचं बस ऑपरेटर्सचं म्हणणंय. मोटर वाहन कायद्यानुसार राज्य सरकारने विविध मार्गावरील बसभाडं निश्चित करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले होते. यासंबंधी सहयोग ट्रस्टने हायकोर्टात याचिका दाखल केली होती . पण हे आदेश रद्द करण्यासाठी खुद्द राज्य सरकारनेच अर्ज केलाय. त्यामुळे सरकार लोकांच्या बाजूने आहे की बस ऑपरेटर्सच्या? असा सवाल सहयोग ट्रस्टने उपस्थित केला आहे.  बस ऑपरेटर्सकडून प्रवाशांची लूट थांबवण्यासाठी राज्य सरकारनं पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

close