मुंबई गँगरेप प्रकरणाच्या खटल्याला सुरुवात

October 21, 2013 8:46 PM0 commentsViews: 232

mumbai gang rape_new21 ऑक्टोबर : मुंबईतील महालक्ष्मी इथं शक्ती मिल बलात्कार प्रकरणाच्या खटल्याला आजपासून सुरुवात झालीय. आज याप्रकरणी आर्किटेक्ट संतोष कांदळकर आणि फोटोग्राफर संतोष जाधव याची साक्ष घेण्यात आली.

 

मागिल आठवड्यात दोन दिवस पीडित तरूणीची साक्ष घेण्यात आली. यावेळी तिने मोठ्या हिंमतीने वकिलांच्या प्रश्नाला सामोरं गेली. तिची साक्ष घेतल्यानंतर आज या प्रकरणातील साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. या प्रकरणात एकूण पाच आरोपी आहेत.

 

त्यापैकी सलीम अन्सारी ,विजय जाधव आणि मोहम्मद कासीम हे तीनजण या प्रकरणातील आरोपी आहेत. तर एक आरोपी अल्पवयीन आहे. त्याला बालसुधारगृहात ठेवण्यात आलंय. या प्रकरणी पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले असून आरोपपत्र एकूण 362 पानाचे आहे आणि 53 साक्षीदार आहेत.

close