पुण्यातल्या विद्यार्थ्यांनी शोधला अनोखा चार्जर

February 5, 2009 11:19 AM0 commentsViews: 1

5 फेब्रुवारी, पुणे प्राची कुलकर्णीमोबाईलला चिकटून राहणार्‍यांची संख्या काही कमी नाही. अशांना सगळ्यात मोठी समस्या असते ती सतत बॅटरी चार्ज करण्याची. बॅटरी उतरली की एकतर कनेक्शन शोधावं लागतं आणि दुसरं म्हणजे मोबाईल चार्ज होईपर्यंत एकाच ठिकाणी थांबावं लागतं. पण आता याची गरज उरणार नाही. कारण पुण्याच्या कॉलेज ऑफ इंजिनियरिंगच्या सहा मुलांनी एका नव्या चार्जरचा शोध लावला आहे. त्या चार्जरचं नाव आहे वॉक ऍण्ड चार्ज चार्जर. वॉक ऍण्ड चार्ज चार्जरमध्ये एकच डिव्हाईस असतो. त्याची स्ट्रिंग एका पायात बांधावी लागते. तर दुसरी दुसर्‍या पायाला जोडावी लागते. तर अशा त्या आगळ्यावेगळ्या चार्जरवर एमपीथ्री प्लेअरही चार्ज करता येतो. वॉक ऍण्ड चार्ज नावाचा चार्जर कमर्शियली लॉन्च करण्यचा पुण्याच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मुलांचा विचार आहे. त्यासाठी ही मुलं या चार्जरचा पेटन्ट ठरवणार आहेत. " सर्वात आधी या गोष्टीचा प्रोव्हीजनल पेटंट पण फाईल केली आहे. पेटन्ट फाईल झाला की चार्जर साडे तीनशे ते चारशे पर्यंत मिळू शकेल, " अशी माहिती ऋषीकेश पांडे यानं दिली. केव्हा एकदा हा नवा चार्जर बाजारात येतो आहे, असं झालं आहे. त्याने मोबाईलला चिकटून राहणा-यांची चार्जिंगची समस्या तर कमी होईल.

close