कारागृह नव्हे सुधारगृह !

October 21, 2013 10:45 PM0 commentsViews: 248

हलीमा कुरेशी, पुणे
21 ऑक्टोबर : कारागृह, तुरूंग म्हटलं की निराश झालेले कैदी आणि त्यांचं बंदिस्त जगणंच सहसा समोर येतं. पण पुण्यातलं येरवडा कारागृह कैद्यांचं सुधारगृह बनलंय.

 
कागदावर वारली पेंटिंग करुन बनविलेल्या पिशव्यांपासून ते लोखंडापासून बनविलेल्या फर्निचरपर्यंत..प्रदर्शनात असलेल्या या सगळ्या वस्तू बनवल्यात कैद्यांनी. पुण्याच्या येरवडा कारागृहात कैद्यांना अगदी प्रशिक्षण दिलं जातं. त्यामुळे बंदिस्त आयुष्यात त्यांच्या हाताला काम मिळतं आणि पैसेही.

 
खास दिवाळीसाठीच्या पणत्या, आकाश कंदील आणि ते खरेदी करण्यासाठीची गर्दी..कारागृह अधिक्षक मीरा बोरवणकर यांनाही याचं कौतुकच वाटतंय. सुरक्षेच्या कारणामुळे इथं कैद्यांना आणलं जात नाही, पण त्यांच्या कामाचं मात्र कौतुकच होतं.

 
हातून घडलेल्या एखाद्या चुकीमुळे बंदिस्त आयुष्य जगणार्‍या या कैद्यांना येरवडा कारागृहानं चूक सुधारण्याची संधी आणि दिलासा दिलाय, हे मात्र नक्की.

close