मंत्रालयाच्या आगीत किती फाईली जळाल्यात?

October 22, 2013 2:35 PM0 commentsViews: 411

Image mantralaya_fire_1._300x255.jpg22 ऑक्टोबर : राज्याचा गाडा ज्या ठिकाणावरुन हलवला जातो अर्थात मंत्रालयाला गेल्या वर्षी भीषण आग लागली होती. त्या आगीमध्ये निरनिराळ्या विभागाच्या किती फाईल्स जळाल्या यासंदर्भात माहितीच्या अधिकारात दोन भिन्न माहिती सामान्य प्रशासन विभागाने दिली आहे.

 

पहिल्यांदा देण्यात आलेल्या माहितीत 63 हजारांपेक्षा जास्त फाईल्स जळाल्याची माहिती देण्यात आली तर दुसर्‍या वेळेस देण्यात आलेल्या माहितीत 86 हजारांपेक्षा जास्त फाईल्स जळाल्या असल्याची माहिती देण्यात आली त्यामुळे तब्बल 23 हजार फाईल्सचा तफावत असल्याची आरटीआय कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी सांगितलं.

 
मंत्रालय आग प्रकरणीच्या एकाच घटनेसंबंधी जानेवारी 2013 आणि ऑक्टोबर 2013मध्ये दिलेली माहिती वेगवेगळी आहे. RTI कार्यकर्ते अभय कोलारकर यांना हा धक्कादायक अनुभव आलाय. जानेवारी महिन्यात दिलेल्या माहितीत 63 हजारांपेक्षा जास्त फाईल्स जळाल्याची माहिती देण्यात आली होती, तर याच महिन्याच दिलेल्या माहितीनुसार 86 हजारांपेक्षा जास्त फाईल्स जळाल्या. एकाच आगीची माहिती देताना हा तब्बल 23 हजारांचा फरक आला कुठून हा प्रश्न उपस्थित होतोय. तसंच नेमक्या किती फाईल्स जळाल्या याही प्रश्नाला उत्तर मिळत नाहीये.

 

- नेमक्या किती फाईल्स जळाल्या? माहितीतला फरक

विभाग         

जानेवारी 2013    

ऑक्टोबर 2013

सामान्य प्रशासन

19711

29021

नियोजन

1613

1631

महसूल

5803   

15761

नगरविकास – 1

1433

15949

नगरविकास – 2         

3493

3449

गृह

19065

10578

उद्योग, ऊर्जा आणि कामगार     

12454

7246

एकूण  

63349    

86349

close