लालू प्रसाद यादव यांची खासदारकी रद्द

October 22, 2013 1:51 PM0 commentsViews: 336

lalu overall pkg22 ऑक्टोबर : चारा घोटाळा प्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे खासदार लालू प्रसाद यादव यांची खासदारकी रद्द झालीये. दोषी लोकप्रतिनिधी कायद्याअंतर्गत खासदारकी गमवावे लागलेले ते दुसरे लोकप्रतिनिधी आहेत.

 

चारा घोटाळा प्रकरणी लालू यांना सहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यामुळे त्यांची खासदारकी रद्द करत असल्याची अधिसूचना लोकसभेच्या सेक्रेटरी जनरल यांनी काढली.

 

जेडीयूचे खासदार जगदीश शर्मा यांनाही तुरुंगवास ठोठावण्यात आलाय. त्यांचीही खासदारकी रद्द करण्याची अधिसूचना काढण्यात आली आहे. सोमवारीच काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार रशीद मसूद यांची खासदारकी रद्द करण्यात आलीये.

close