मूर्ती सत्यमचे नवे सीइओ

February 5, 2009 11:36 AM0 commentsViews: 2

5 फेब्रुवारी ए.एस. मूर्ती यांची सत्यमचे नवे सीइओ म्हणून निवड झाली आहे. तसंच पार्थो दत्ता आणि होमी खुसरोखान सत्यमचे नवे विशेष सल्लागार म्हणून नियुक्त झाले आहेत. बहुचर्चित सत्यम कॉम्प्युटर्सच्या सीईओपदी ए.एस.मूर्ती यांची निवड करण्यात आली आहे. मूर्ती हे सत्यमचे सध्याचे ग्लोबल बिझनेस हेड आहेत. तसंच होमी खुसरोखान आणि पार्थो दत्ता यांची विशेष सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सत्यममधल्या घोटाळ्यानंतर उद्भवलेल्या खडतर परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी कंपनीच्या कार्यपद्धतीची पूर्ण माहिती असणा-या अंतर्गत प्रमुखाचीच जास्त गरज होती आणि म्हणूनच मूर्ती यांना पाठिंबा मिळाला असं सत्यमचे बोर्ड सदस्य दीपक पारीख यांनी सांगितलं. संध्याकाळी नवे सीईओ कर्मचा-यांशी बोलणार आहेत.

close