आला नोकियाचा टॅब्लेट

October 22, 2013 8:42 PM0 commentsViews: 1619

मायक्रोसॉफ्ट विंडोज्‌मध्ये नोकिया विलिन झाल्यानंतर आता टॅब्लेटच्या शर्यतीत ‘नोकिया’ने दमदार पाऊल टाकले आहे. नोकियाने लुमिया 2520 हा विंडोज् टॅब्लेट लाँच केलाय. 10.1 इंच एचडी स्क्रिन आणि 2.2 गेगाह्रटस् प्रोसेसर असा हा विंडोज् टॅब्लेट लाँच केलाय. या टॅब्लेटमध्ये समोर 2 मेगा पिक्स कॅमेरा आणि पाठीमागे 6.7 मेगापिक्सचा कॅमेरा देण्यात आलाय. त्यासोबतच 2 जीबी रॅम, आणि 32 जीबी इंटरनल डिस्क स्पेस देण्यात आलीय. विशेष म्हणजे या टॅबमध्ये विंडोज आरटी 8.1 क्षमतेचं प्रोसेसर देण्यात आलंय. याची किंमत तब्बल 499 डॉलर इतकी आहे.

close