पंकजा मुंडे-पालवे यांची मुलाखत

October 22, 2013 9:58 PM1 commentViews: 2572

22 ऑक्टोबर : देशात गांधी घराण्यापेक्षाही पवार घराणं सत्तेत जास्त काळ आहे पण तरीसुद्धा अजूनही बारामतीतल्या चाळीस गावांना टँकरनं पाणीपुरवठा होतोय त्यामुळे बारामतीच्या विकासाचा जो दावा केला जातो तो तितकासा खरा नाही अशी खरमरीत टीका भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष पंकजा मुंडे पालवे यांनी केलीय. बारामती जणू केंद्रशासित प्रदेश आहे असं चित्र पावारांनी जाणीवपूर्वक निर्माण केलंय, अशी टीकाही त्यांनी केलीय. आयबीएन लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत पंकजा यांनी पवार कुटुंबावर जोरदार टीका केली. तसंच गोपीनाथ मुंडे यांना बदनाम करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने बीड जिल्हा बँकेच्या घोटाळ्याचं प्रकरण उचलून धरलं पण आता त्यात अडकलेले राष्ट्रवादीचे नेते गायब झालेले आहेत त्यामुळे बीडमध्ये राष्ट्रवादी ची ओळख फरार राष्ट्रवादी अशी झालीय अशी बोचरी टीकाही पंकजा मुंडेंनी केलीय.

  • yogeshjagtap

    dhananjay mundhe mule pethleli aag ahe,ti lavkar vizel ase vatat anhi

close