डी.पी.कंपनीला टाळं, 300 कामगार रस्त्यावर

October 22, 2013 10:04 PM0 commentsViews: 474

d p company422 ऑक्टोबर : उरणमधल्या न्हावा-शेवा बंदरातील डी.पी.वर्ल्ड कंपनी या कंपनीनं कामगारांच्या पगारवाढीच्या मागणीविरोधात कंपनीला टाळं ठोकलंय. यामुळे 300 कामगार रस्त्यावर आलेत. पगारवाढ मिळावी म्हणून कामगारांनी प्रस्ताव सादर केला. कंपनीनं प्रस्ताव डावलून कंपनीला टाळं लावले.

 

स्थानिक प्रकल्पग्रस्तांना डावलून परराज्यातील कामगारांना ठेवण्याचा घाट घालत असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. याचाच फटका वाहतुकीलाही बसलाय. उरण ते जे.एन.पी.टी. दरम्यान कंटेनरच्या साधारण 15 ते 20 किलोमीटर अंतराच्या रांगा लागल्या आहेत.

 

मुख्य म्हणजे या कंपनीच्या निर्णयामुळे स्वत:चंच कोट्यावधीचं नुकसान करुन घेतलंय. टाळेबंदीमुळे या कंपनीचे व्यवहारही ठप्प झालेत. रस्त्याच्या दुतर्फा लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक पूर्णत: विस्कळीत झालीय. त्यामुळे इतर परिस्थितीवरही त्याच्या परिणाम झालाय.

close