भारत आणि चीनदरम्यान सामंजस्य करार

October 23, 2013 3:13 PM0 commentsViews: 289

pm meet chin23 ऑक्टोबर : सीमारेषेवर असलेल्या तणावावर तोडगा काढण्यासाठी भारत आणि चीनने पुन्हा एकदा हातमिळवणी केलीय. दोन्ही देशात सीमा सुरक्षेसंबंधी करार करण्यात आलाय. त्याशिवाय पाणी, वीज आणि नालंदा विद्यापीठासाठी दोन्ही देशांदरम्यान सामंजस्य करार करण्यात आले.

 

ब्रह्मपुत्रेसारख्या दोन्ही देशांमधून वाहणार्‍या नद्यांच्या पाण्याच्या वाटपावरुन दोन्ही देशांमध्ये वाद आहे. त्यामुळे पाण्याच्या वाटप करण्यासंबंधी करार करण्यात आला. कराराअंतर्गत चीन भारतामध्ये वीज उपकरणे सेवा प्रकल्प उभारणार आहे. बिहारमध्ये नालंदा विद्यापीठाच्या उभारणीसाठी चीन भारताला मदत करेल. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे भारत आणि चीनच्या शहरांमध्ये सिस्टर सिटी रिलेशन विकसित करण्याचाही प्रस्ताव आहे.

 

यासाठी भारतातल्या बंगळुरू आणि कोलकाता या शहरांची निवड करण्यात आली आहे. 2013 ते 2015 या कालावधीदरम्यान सांस्कृतिक देवाणघेवाण होईल. पंतप्रधानपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर आपण सर्वात आधी भारताचा दौरा केला, याकडं चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांनी लक्ष वेधलं. तर दोन्ही देशांमधल्या सीमेवर शांतता असल्याशिवाय द्विपक्षीय संबंध आणखी दृढ होणार नाहीत असं पंतप्रधान डॉ. सिंग यांनी ठणकावून सांगितलं.

close